• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद करा

वेबसाइट धोरणे

वापरण्याच्या अटी

संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत केले जाते. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,अहिल्यानगर जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावर समाविष्ट असलेल्या इतर संकेतस्थळाच्या लिंक्स फक्त नागरिकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. आम्ही नेहमी अशा लिंक केलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेची हमी देत नाही.
भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद जिल्हा न्यायालय,अहिल्यानगर क्षेत्रात राहील.

कॉपीराइट धोरण

या संकेत स्थळावरील माहिती आम्हाला एक मेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर विनामूल्य पुन: प्रस्तुत केली जाऊ शकते. तथापि, संकेत स्थळावरील माहिती अचूकपणे पुन: प्रस्तुत करणे आवश्यक आहे आणि अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. तथापि ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुन: प्रस्तुत करण्याची अनुमती त्रयस्थ पक्षाच्या सर्वाधिकार (कॉपीराइट) माहिती पर्यत विस्तारीत करू शकत नाही, अशा प्रकारच्या माहितीचे पुनरुत्पादित करण्यासाठी संबंधित विभाग / सर्वाधिकार (कॉपीराइट) धारकांकडून परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे.

गोपनीयता धोरण

हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर हे संकेतस्थळद्वारे आपल्याला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली असेल, तर आपल्याला अशी माहिती का घेतली जाते आहे त्याचा उद्देश स्प्ष्ट दिला जाईल उदा. प्रतिक्रिया अर्ज. आणि आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी पर्याप्त सुरक्षिततेच्या उपाययोजना घेतल्या जातील. आम्ही ह्या संकेतस्थळावरील कोणत्याही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीची विक्री कोणत्याही तृतीय पक्ष (सार्वजनिक / खाजगी) करीत नाही किंवा सामायिक करीत नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, फेरबदल किंवा विनाश यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही भेटी दिलेल्या पृष्ठांबद्दल विशिष्ट माहिती गोळा करतो जसे इंटरनेट प्रोटोकॉल,आय. पी. एड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ, भेटी दिलेल्या पृष्ठ इ. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो.

हायपर लिंकिंग धोरण

बाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील दुवे

या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळाचे / पोर्टल्सचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. आम्ही हमी देऊ शकत नाही की हे लिंक्स सर्व वेळ काम करतील आणि जोडलेल्या पृष्ठांची उपलब्धता यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.