बंद करा

संजय गांधी योजना

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य योजना विभाग, महाराष्‍ट्र शासन
विभागाचे नाव : संजय गांधी योजना
विभागाचे कार्य :
निराधार, अंध अपंग शाररिक आजाराने रोगग्रस्‍त व्‍यकती, निराधार विधवा,परित्‍यक्‍तया देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थ सहाय्य देण्‍याच्‍या हेतुने राज्‍य पुरस्‍कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्‍द व्‍यकतीसाठी श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्‍कृत दारिद्र रेषेखालील वृध्‍द व्‍यकतींसाठी इंदीरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना विधवा महिलांकरीता इंदीरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍तीवेतन योजना व दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी इंदीरा गांधी राष्‍ट्रीय अपंग निवृत्‍तीवेतन योजना राबविणे.

विविध योजनाबाबतची माहिती

आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील. या संविधानातील वरील तरतुदीस अनुसरुन राज्यात सन १९८० पासून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार/ आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत होती. दिनांक २०ऑगस्‍ट २०१९ रोजीच्या शासन निणर्यांन्वये काही सुधारणा करुन ही योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राज्यात राबविण्यात येत आहे

  • राज्‍य शासन पुरस्‍कृत सामाजिक अर्थसहाय्य योजना
  • केंद्र शासन पुरस्‍कृत सामाजिक अर्थसहाय्य योजना

उत्‍पन्‍नाचा दाखला
शासन निर्णय विसयो २०२२/ प्र क्रं ६२/ विसयो २० ऑगस्‍ट २०१९ मध्‍ये नमुद केले नुसार ज्‍या व्‍यक्‍तीचे किंवा त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबाचे उत्‍पन्‍न स्‍थावर / जंगम मालमत्‍ता पासून मिळणारे उत्‍पन्‍न वा सज्ञान मुलाकडून व इतर व्‍यक्‍तीकडून मिळत असलेली मदत असे एकत्रित करुन त्‍याचे कायमस्‍वरुपी चरितार्थ चालविण्‍याकरीता पुरेसे उत्‍पन्‍न नसल्‍यास अशा व्‍यकतीस पात्र समजावे

अर्थ सहाय वितरण व संनियंत्रण पध्‍दती पडताळणी

  1. लाभार्थी हयात असल्‍याबाबत वर्षातुन एकदा तपासणी करणे आवश्‍यक आहे
  2. लाभ बंद करण्‍याबाबतची कार्यवाही
    मयत असताना लाभ मिळत आहे
    स्‍थलांतरीत आहे लाभ मिळत आहे
    लाभार्थी गावातील नाही.
    लाभार्थी व्‍यकतींचा शेाध लागत नाही
    अशा व्‍यकतीस हयात प्रमाणपत्र सादर न केल्‍यास लाभ बंद करण्‍यात यावा
अ. क्र. योजना माहिती
संजय गांधी निराधार अनुदान योजना  (विधवा, अपंग, आजार, परितक्‍यात निराधार,घटस्‍फोटीत )

  1. वय वर्षे 18 ते 65
  2. महाराष्‍ट्राचा रहिवासी (किमान 15 वर्षापासुन)
  3. कुटूंबाचे उत्‍पन्‍न- 21,000/- पर्यंत (अपंग लाभार्थ्‍यांकरीता – 50000/-) तहसिलदार यांचा दाखला
  4. वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍यश्‍सचा दाखला/वैदयकीय अधिकारी यांचा दाखला
  5. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  6. अपंग व्‍यकती (किमान 40% अपंगत्‍वाचा जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचे प्रमाणपत्र)
  7. लाभाची रक्‍कम 1500/- रुपये
श्रावण बाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना
  1. वय वर्ष 65 व 65 वर्षावरील
  2. महाराष्‍ट्राचा रहिवासी (किमान 15 वर्षापासुन)
  3. कुटूंबाचे उत्‍पन्‍न – 21000/- (दिव्‍यांग लाभार्थ्‍यांकरीता – 50000/-)पर्यंत तहसिलदार यांचा दाखला
  4. वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍याचा दाखला/वैदयकीय अधिकारी यांचा दाखल
  5. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  6. लाभाची रक्‍कम दरमहा 1500/- रुपये
इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृतीवेतन योजना
  1. वय वर्ष 40 ते 79 वयोगटातील विधवा
  2. कुटूंबाचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत समाविष्‍ठ असावे
  3. महाराष्‍ट्राचा रहिवासी (किमान 15 वर्षापासुन)
  4. वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍याचा दाखला/वैदयकीय अधिकारी यांचा दाखला
  5. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  6. केंद्र शासन रुपये 300/- दरमहा व राज्‍य शासनाकडून दरमहा रुपये 1200/- असेएकुण 1500/-
इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग निवृतीवेतन योजना
  1. वय वर्ष 18 ते 79 वयोगटातील अपंग
  2. कुटूंबाचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत समाविष्‍ठ असावे
  3. महाराष्‍ट्राचा निवासी (किमान 15 वर्षापासुन)
  4. वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍याचा दाखला/वैदयकीय अधिकारी यांचा दाखला
  5. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  6. अपंग व्‍यक्‍ती 80% – (अपंगत्‍ववाचा जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचे प्रमाणपत्र)
  7. केंद्र शासन रुपये 300/- दरमहा व राज्‍य शासनाकडून दरमहा रुपये 1200/- असे एकुण 1500/-
राष्‍ट्रीय कुटूंब लाभ योजना
  1. कुटूंबाचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत समाविष्‍ठ असावे
  2. महाराष्‍ट्राचा रहिवासी (किमान 15 वर्षापासुन)
  3. कुटुंबातील कमावती मृत व्‍यक्‍तीचे 18 ते 59 च्‍या दरम्‍यान असावे (वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍याचा दाखला)
  4. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  5. कुटुंबातील कमावती व्‍यक्‍ती मयत झालयानंतर 3 वर्षाआत प्रकरण करणे बंधनकारक
  6. एकरकमी अर्थसाहाय्य एकुण रुपये 20000/-
इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दपकाळ निवृतीवेतन योजना
  1. वय वर्ष 65 व 65 वर्षावरील
  2. कुटूंबाचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत समाविष्‍ठ असावे
  3. महाराष्‍ट्राचा रहिवासी (किमान 15 वर्षापासुन)
  4. वयाचा दाखला – जन्‍म नोंदीचा दाखला/शाळा सोडल्‍याचा दाखला/वैदयकीय अधिकारी यांचा दाखला
  5. रहिवाशी दाखला – ग्रामसेवक/तलाठी/मंडळाधिकारी यांनी दिलेला
  6. केंद्र शासन वय 65 ते 79 पर्यंतच्‍या लाभार्थ्‍यांना रुपये 200/- दरमहा व राज्‍य शासनाकडून दरमहा रुपये 1300/- असे एकुण 1500/-
  7. केंद्र शासन वय वर्ष 80 पेक्षा जास्‍त असल्‍यास लाभार्थ्‍यांना रुपये 500/- दरमहा व राज्‍य शासनाकडून दरमहा रुपये 1000/- असे एकुण 1500/-
विभाग संपर्क
नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल
श्री सिध्‍दाराम सालीमठ जिल्‍हाधिकारी २४१२३४५००१ collector.ahmednagar@maharashtra.gov.in
श्री अतुल चोरमारे उपजिल्‍हाधिकारी महसूल २४१२३२५००१ sgy.ahmednagar@gmail.com
श्री सचिन डोंगरे तहसिलदार संगायो २४१२३२५००१ sgy.ahmednagar@gmail.com
श्री एम एम काळे महसूल सहाय्यक ७९७२९९२०१७ sgy.ahmednagar@gmail.com
श्री भानवसे नायब तहसिलदार अहिल्‍यानगर ७२१८१८७०७९ nagartahsildar@gmail.com
श्री संदिप चिंतामणी नायब तहसिलदार नेवासा ९८६०९६४११७ tahasilnewasa@gmail.com
श्री अमोल बन नायब तहसिलदार श्रीगोंदा ८७८८६६६५९५९ tahsildarshrigonda@gmail.com
श्री डॉ आकाश रामाहरी किसवे प्रभारी नायब तहसिलदार पारनेर ८८८८८७५२७० tahasildarparner@gmail.com
श्री ठोंबरे पी. ए. नायब तहसिलदार कर्जत ९४२०६७२४५७ tahasildarkarjat@gmail.com
श्री प्रदीप पंडुले नायब तहसिलदार जामखेड ९७६३५३५००३ tahasiljamkhed@gmail.com
श्री दिग्‍वीजय पाटील नायब तहसिलदार पाथर्डी ७५८८४८९५८५ tahsildarpathardi@gmail.com
श्री वाघमारे निलेश शशांक नायब तहसिलदार शेवगांव ७७४४८४००४० tahasilshevgaon@gmail.com
श्री शेकटकर डी पी नायब तहसिलदार श्रीरामपुर ७०२०७५६४७४७ tahshrirampur@gmail.com
श्री .एस.व्ही.औटी नायब तहसिलदार राहुरी ९८६०१०९३०० tahasilrahuri11@gmail.com
श्री बाबासाहेब मुळे नायब तहसिलदार राहता ७३५०८६९६४४ tahsilrahata1999@gmail.com>
श्री गोसावी व्‍ही. आर. नायब तहसिलदार कोपरगांव ९९६०३६०४४७ kopargaonrnt@gmail.com
श्री राजेश पउळ नायब तहसिलदार संगमनेर ८४१२०५६१३४ tahsildarsagmner@gmail.com
श्री एम ए माळवे नायब तहसिलदार अकोले ९४२२८४०२३३ tahsildarakole@gmail.com
श्री सुहास जोशी उपलेखापाल नगर शहर ९८९०६४६८२७ sgycity1045@gmail.com

विभागाचे शासन निर्णय

अ.क्र. शासन निर्णय दिनांक फाइल
२० ऑगस्‍ट २०१९ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,५२३केबी)
५ जुलै २०२२ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१४१ केबी)

विभागाचे विविध अर्ज

अ.क्र. अर्ज फाइल
संजय गांधी निराधार योजनेखाली अर्थसहाय्यासाठी करावयाचा अर्ज फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
लाभार्थ्‍यांचा हयातीचा दाखला मागणी अर्ज फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,७२०केबी)

विशेष सहाय्य योजना लाभार्थी यादी

अ.क्र. तालुक्‍याचे नाव लाभार्थी यादी
नगर ग्रामीण फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
नेवासा फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
श्रीगोंदा फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
पारनेर फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,४एमबी)
कर्जत फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,२एमबी)
जामखेड फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
पाथर्डी फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
शेवगांव फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
श्रीरामपुर फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
१० राहुरी फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
११ राहता फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,२एमबी)
१२ कोपरगांव फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
१३ संगमनेर फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
१४ अकोले फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)
१५ नगर शहर फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,१एमबी)